गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आंध्र प्रदेश, ओडिशा सीमेवर चकमकीत 24 माओवादी ठार

मलकनगिरी (ओडिशा)- आंध्र प्रदेश, ओडिशा सीमेवर मलकनगिरी जिल्हय़ात झालेल्या चकमकीत 24 माओवादी नक्षलवादी ठार झाल्याचे सांगण्यात आले. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच पोलिसांचे पथक जंत्री गावानजीक गस्त घालत असताना नक्षलवाद्यांशी चकमक झाली.
 
पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दशकांपासूनचे नक्षलींचे ‘सेफ हेवन’ उद्ध्वस्त झाले आहे. मलकनगिरी येथील पोलीस अधीक्षक मित्रभानू मोहपात्रा यांनी संयुक्त मोहिमेत 24 नक्षली मारले गेल्याचे स्पष्ट केले आहे. मृतांमध्ये सात महिलांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी चकमक झाली तो भाग अतिशय दुर्गम जंगलातील असल्यामुळे मृत नक्षलींचे मृतदेह हेलिकॉप्टरने मलकनगिरी येथे आणण्यात आल्याचे मोहपात्रा यांनी सांगितले. या परिसरात शोधमोहीम अद्याप चालू असून अनेक नक्षलवादी जखमी झालेले असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
 
गुप्तचर यंत्रण्यांच्या अहवालानुसार नक्षलवाद्यांचा मोठा प्रशिक्षण कॅम्प मलकनगिरीनजीकच जंगलात चालू असल्याचे स्पष्ट झाले होते. या माहितीवर आधारित आंध्र प्रदेशचे ग्रेहाऊंड कमांडो आणि ओडिशाच पोलिसांचे सशस्त्र पथक या कामगिरीवर पाठवण्यात आले होते.