शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (15:05 IST)

मराठमोळे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी देशाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ

DY Chandrachud
मराठमोळे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आज भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यायमूर्ती चंद्रचूड यांना शपथ दिली. न्यायमूर्ती चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत दोन वर्षांसाठी या पदावर असणार आहेत.
 
धनंजय यशवंत चंद्रचूड हे 1978 ते 1985 या काळात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. अनेक ऐतिहासिक निकाल दिलेल्या अनेक घटनापीठांचा तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा ते भाग राहिले आहेत. दरम्यान त्यांनी अयोध्या, IPC च्या कलम 377 अंतर्गत समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी ठरवणे, शबरीमाला प्रकरण, आधार योजनेच्या वैधतेशी संबंधित प्रकरणे, भारतीय नौदलात महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी अधिकार देणे असे अनेक निर्णयांमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.
 
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठामधून एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. 1998 मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये वरिष्ठ वकील म्हणून नामांकन मिळाले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor