सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (19:37 IST)

3 फूटाच्या जोडप्याचे लग्न

marriage
असं म्हणतात की 'जोड्या वरूनच बनून येतात' . देवाने प्रत्येकासाठी जीवनसाथी बनवले आहे. बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील पुनौरा धाममध्ये ही गोष्ट खरी ठरली. येथे तीन फुटी वधूला अखेर तिचा वर सापडला आहे. 
 
वराची उंचीही तीन फूट आहे. नाते पक्के झाल्यानंतर रविवारी दोघांनी थाटामाटात लग्न केले. या अनोख्या लग्नाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा असे तीन फुटांच्या वधूचे नाव आहे. मेळा रोड, लोहिया नगर, सीतामढी येथे राहणारी पूजा ही 21 वर्षांची आहे. सीतामढी जिल्ह्यातील डुमरा ब्लॉकमधील रामपूर परोरी गावात राहणाऱ्या 32 वर्षीय योगेंद्रसोबत तिचा विवाह झाला.
 
लग्नात उंची अडथळा ठरत होती
पूजा आणि योगेंद्र यांनी सांगितले की, आमच्या लग्नासाठी कुटुंबीयांना खूप त्रास होत होता. कमी उंचीमुळे संबंध अजिबात सापडत नव्हता. मग ओळखीच्या माध्यमातून आमची कुटुंबे एकमेकांच्या संपर्कात आली. आमचे नाते पक्के झाले आणि आता आमचे लग्न झाले आहे. या लग्नामुळे आम्ही दोघे आणि आमचे कुटुंबीय खूप आनंदी आहोत.
Edited by : Smita Joshi