रविवार, 13 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 11 एप्रिल 2025 (12:34 IST)

सुरत जिल्ह्यात उंच इमारतीच्या ७ व्या मजल्यावर भीषण आग लागली

Surat News : गुजरातमधील सुरत जिल्ह्यात शुक्रवारी एका उंच इमारतीला भीषण आग लागली. वेसू परिसरातील हॅपी एक्सलन्सीच्या ७ व्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. आग लागल्याने परिसरात घबराट पसरली. इमारतीत राहणारे लोक बाहेर आले.  
तसेच आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. इमारत रिकामी करण्यात आली आहे. आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. स्थानिक पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनेच्या ठिकाणी उपस्थित आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी ज्या इमारतीत राहतात. त्यांच्या समोरच्या इमारतीत आग लागली. आगीची माहिती मिळताच गृहमंत्री हर्ष संघवी देखील घटनास्थळी पोहोचले.
Edited By- Dhanashri Naik