1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार ? दिल्लीत आज बैठकांचे सत्र

Meeting session in Delhi today
राज्यातला सत्ता स्थापनेचा तिढा दिल्लीमध्ये सुटण्याची शक्यता आहे. सोमवारी दिल्लीमध्ये महत्त्वाच्या बैठका होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीला जाऊन मुख्यमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. राज्यातल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या माध्यमातून अधिकाधिक आणि तातडीची मदत मिळावी, यासाठी फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावरही चर्चा होईल, अशी माहिती मिळत आहे.
 
दुसरीकडे दिल्लीतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची पुढची भूमिका ठरवण्याबाबत ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.