पुण्यात सापडले हॅन्डग्रेनेड, चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर बॉम्ब निकामी
पुण्यात रेल्वे पार्किंगजवळील रस्त्याच्या बाजूला हॅन्डग्रेनेड आढळून आले आहे. पुण्यातील ताडीवाला रस्त्याच्या परिसरातील पार्किंगच्या बाजूला हे हॅन्डग्रेनेड आढळून आले आहे याबाबतची माहिती मिळताच पुणे पोलिसांसह बॉम्बशोधक आणि निकामी पथकाने तो निकामी केला.
पुण्यातील प्रसिद्ध ताडीवाला रस्त्यावर रेल्वे विभागाचे मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयाच्या शेजारी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी पादचारी उड्डाणपूल आहे. या पुलाजवळ असलेल्या पार्किंगच्या रस्त्यावर हे हॅन्डग्रॅनाईट सदृश्य वस्तू असल्याचे जाणवले. त्यावेळी साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हॅन्डग्रेनेड असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली होती.
त्यानंतर बॉम्बशोधक आणि निकामी पथकाने चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर हा बॉम्ब निकामी केला. या हॅण्डग्रॅनाईट सदृश वस्तूचे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत.