रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019 (17:12 IST)

मराठमोळे सतीश खंदारे लडाखचे पहिले पोलीस प्रमुखकेंद्र

सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर आणि लडाखचे अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली आहे. हे दोन्ही प्रदेशांना ३१ ऑक्टोबरपासून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानंतर लडाखच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्राकडे देण्यात आली आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या लडाखच्या पोलीस प्रमुखपदी मराठमोळ्या सतीश खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 
सतीश खंदारे हे अमरावतीच्या धामणगावचे सूपुत्र लडाखचे पहिले पोलीस प्रमुख ठरणार आहे. खंडारे यांचे प्राथमिक शिक्षण अमरावतीमधील धामणगाव तालुक्यातील जळका पटाचे येथील अशोक विद्यालयात झाले. दहावीची परिक्षा त्यांनी १९८६ मध्ये ८६ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण केली. त्यानंतर धामणगावांतील सेफला हायस्कूलमधून बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे येथील सीओयुपी अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते १९९२ मध्ये बीई झाले. त्यानंतर १९९५ मध्ये ते आयपीएस बनले.