गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 19 जून 2021 (18:17 IST)

गेल्या 5 वर्षांपासून मेव्हणा करत होता भाऊजीची पोलिसाची नोकरी

Mevhana had been working for her nephew for the last 5 years
पोलीस विभागात एक अजब प्रकार समोर आला आहे. गेल्या 5 वर्षांपासून भाऊजी यांच्याऐवजी मेव्हणा पोलीस म्हणून नोकरी करत असल्याचं समोर आलं आहे.
याप्रकरणी आरोपीची चौकशी सुरू आहे. तसंच एका आरोपीला अटक करण्यात आली आहे
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील ठाकुरद्वारा ठाण्यात कॉन्स्टेबल अनिल कुमार यांच्याऐवजी त्यांचा मेव्हणा सुनील उर्फ सनी ड्यूटी करत होता. तो 5 वर्षांपासून हे काम करत होता.
याप्रकरणी तक्रार करण्यात आल्यानंतर झालेल्या चौकशीत पोलीस विभागातील ही चूक समोर आली. याप्रकणी अनिल कुमार यांना अटक करण्यात आली असून सुनील फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.