शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (18:49 IST)

मोदी २६ सप्टेंबरला युएन असेंब्लीला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबरला युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीला संबोधित करू शकतात. उच्चस्तरीय बैठकीसाठी ग्लोबल बॉडीने जाहीर केलेल्या स्पीकर्सच्या तात्काळ यादीमध्ये ही माहिती समोर आली आहे.
 
संयुक्त राष्ट्राच्या ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच यावर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेचे अधिवेशन ऑनलाईन होत असून जागतिक महामारीमुळे देशाचे प्रमुख बैठकीत थेट सहभागी होता येणार नाहीये. या सत्रासाठी आधीच रेकॉर्ड केलेले व्हिडिओ चालवले जाणार आहेत.
 
मंगळवारी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जनरल असेंब्ली आणि कॉन्फरन्स मॅनेजमेंट विभागाने 75 व्या अधिवेशनाच्या सर्वसाधारण चर्चेसाठी वक्त्यांची यादी जाहीर केली. या यादीनुसार, २६ सप्टेंबर रोजी सकाळी सर्वसाधारण चर्चेला मोदी संबोधित करू शकतात. पण पुढील दोन आठवड्यांमध्ये आणखी काही बदल होऊ शकतात. सर्वसाधारण चर्चा २२ ते २९ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.
 
यादीनुसार ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो हे पहिले वक्ते आहेत. सर्वसाधारण चर्चेच्या पहिल्या दिवशी अमेरिका हा दुसरा स्पीकर आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संबोधित करतील.