1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated: मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (19:12 IST)

मोदींचा आज मुख्यमंत्र्यांशी संवाद

ओमायक्रॉनच्या  परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी  गुरुवारी 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. रुग्णवाढ विक्रमी असल्याने अनेक राज्यांत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे कोरोना व ओमायक्रॉनची सद्यःस्थिती, आरोग्यविषयक पायाभूत संरचना, लसीकरण मोहीम, ओमायक्रॉनचा वाढता प्रसार आणि सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम याची समीक्षा या बैठकीत करण्यात येणार आहे.
 
कोरोनावर मात करण्यासाठी प्रामुख्याने पायाभूत सुविधा भक्कम करणे आणि प्रौढांसाठी लस उपलब्ध करून देण्यावर मोदींचा भर राहील, असे सूत्रांनी सांगितले. कोरोना महामारीशी दोन हात करण्यासाठीची तयारी व आरोग्यविषयक सुविधा आदींचा आढावा मोदी घेणार आहेत. दरम्यान, कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धे आणि गंभीर आजार जडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्रतिबंधात्मक बूस्टर डोस देण्याचे अभियान सुरू झाले आहे.