1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Last Updated : रविवार, 17 मे 2026 (14:28 IST)

मान्सूनचे अंदमान-निकोबारमध्ये आगमन

monsoon
सध्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा देणारी बातमी आली आहे. नैऋत्य मान्सून ने भारतात प्रवेश केला असून अंदमान निकोबार बेटापर्यंत पोहोचल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.  
मान्सूनने आगमन केल्याने अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागरातील काही भागातील वातावरणात बदल झाला असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. 
 
 हवामान विभागाच्या माहितीनुसार, अंदमान परिसरात सध्या पश्चिमेकडील वारे वेगाने सक्रिय झाले आहे.
पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून आणखी वेगाने पुढे सरकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः आग्नेय अरबी समुद्र आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात मान्सूनचा वेग वाढण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आले आहे. 
 यंदा मान्सून वेळेआधी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरवर्षी साधारणपणे 1 जूनला केरळ किनारपट्टीवर पोहोचणारा मान्सून यावेळी 26 मेच्या आसपासच राज्यात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनचा प्रवास सुरळीत होण्याची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. गोव्यात 5 जूनपर्यंत, कोकणात 6 जूनपर्यंत आणि पुण्यात 7 जूनच्या आसपास मान्सून दाखल होऊ शकतो,  अशी शक्यता आहे. 
Edited By - Priya Dixit