शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (10:07 IST)

आईला झाडाला बांधून दोन मुलांनी जिवंत जाळत केली निर्घृण हत्या

पश्चिम त्रिपुरामध्ये एका 62वर्षीय महिलेला तिच्या दोन मुलांनी झाडाला बांधून तिला जिवंत जाळत तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी रात्री चंपकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खंबरबारीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार महिलेच्या पतीचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. ही महिला तिच्या दोन मुलांसह राहत होती. या पाहिलेच दुसरा मुलगा आगरतळा येथे राहत होता.
 
मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम त्रिपुरामध्ये एका 62वर्षीय महिलेला बांधून तिला जिवंत जाळत तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक केली आहे. कौटुंबिक वादातून दोन्ही मुलांनी हा भयंकर गुन्हा केल्याचा पोलिसांना संशय आहे.
 
पोलीस अधिकारी कमल कृष्ण कोलोई यांनी  सांगितले की, "एका महिलेला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांचे एक पथक तेथे पोहोचले आणि झाडाला बांधलेला जळालेला मृतदेह खाली काढला. त्यानंतर मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला.
 
कमल कृष्णा कोलोई यांनी पुढे माहिती दिली की, या महिलेच्या दोन मुलांना या प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. त्यांना सोमवारी कोर्टात हजर करून चौकशीसाठी पोलिस कोठडी मागितली जाणार आहे. या घटनेमागे कौटुंबिक वाद हे कारण असू शकते. असा पोलिसांनी संशय आहे.