शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (20:16 IST)

शेतकरींना मोदी सरकारकडून भेट,खरीप पिकांवर MSP दर वाढली

नवी दिल्ली. खरीप सामान्य धान्याच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी)दर प्रति क्विंटल 72 रुपये आणि बाजरीच्या दर प्रति क्विंटलमध्ये 100 रुपयांची वाढ करण्याची सरकारने बुधवारी घोषणा केली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीपरिषदेच्या बैठकीत खरीप पिकांच्या एमएसपी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरकारने डाळी,मका,तेलबियाआणि इतर काही पिकांचा MSP दर वाढवण्याचा निर्णय सरकार ने घेतला आहे.
 
कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी नंतर सांगितले की, सामान्य भाताचा एमएसपी दर 1868 रुपयांवरून 1940 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. बाजरीचा एमएसपी दर 2150 रुपयांवरून 2250 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे.