शुक्रवार, 30 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 29 ऑक्टोबर 2016 (17:27 IST)

अंबानी झोपेत सुद्धा कोटी रुपये कमावतात

mukesh ambani
भारतातील सर्वात मोठय इंडस्ट्रीजचे  रिलायन्स  सर्वेसर्वा आणि प्रमुखे असलेले मुकेश अंबानी झोपेत असतानाही सुमारे  4 कोटी रुपये कमवत आहेत, जगप्रसिद्ध असलेल्या आणि विश्वसनीय असलेल्या फोर्ब्स मॅगझिनने ही माहिती  दिली आहे. दिवाळीच्या निमित्ताने  फोर्ब्सने कॉर्पोरेट, क्रिकेट, बॉलिवूडमधील श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे.यातील प्रसिद्ध आणि श्रीमंत असलेल्या  कमाईची आकडेवारी मासिकाने जाहीर केली आहे. सलग नवव्या वेळा मुकेश अंबानी देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. 
 
मुकेश आयणी संपत्ती  22.7 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 1.52 लाख कोटी रुपये आहे. अंबानी यांना कंपनी  पगार 39 कोटी रुपये पगार देते. मात्र जेव्हा  मुकेश अंबानी सात तास झोपतात. तर झोपेतही ते 4 कोटी 37 लाख रुपये कमावतात, अशी माहिती फोर्ब्सने दिली आहे. मात्र यासाठी ते जागे असताना आपला व्यवसाय खूप काळजीपूर्वक आणि सातत्त्याने उत्तम सांभाळतात.