मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified रविवार, 20 नोव्हेंबर 2022 (17:50 IST)

कोलकाता मध्ये पुन्हा श्रद्धा प्रकरणा सारखी हत्या, मृतदेहाचे 6 तुकडे केले

murder
श्रद्धा वालकर हत्याकांडाचा शोध अद्यपि पूर्णपणे लागलेला नाही. तो वर कोलकात्यातील पश्चिम बंगाल येथून एका धक्कादायक घटनेची माहिती मिळाली आहे. ही घटना कोलकात्याच्या बारुईपुर येथे घडली आहे.येथे एका मुलाने आपल्या आईच्या सांगण्यावरून जन्मदात्या पिताची हत्या केली. नंतर मृतदेह लपविण्यासाठी मृतदेहाचे करवतीने 6 तुकडे केले. मुलाने बाथरूममध्ये मृतदेह कापला नंतर तुकडे फेकण्यासाठी बाहेर पडला. उज्ज्वल चक्रवर्ती असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. आई आणि मुलाने उज्ज्वलची हत्या केली आणि  श्रद्धा हत्याकांड ने प्रेरित होऊन बाथरूम मध्ये करवतीने मृतदेहाचे 6 तुकडे केले नंतर मृतदेहाचे तुकडे फेकून देण्यासाठी आई आणि मुलगा सायकलवर फेकण्यासाठी बाहेर पडले. पोलीस प्रकरणाचा शोध घेत आहे. 

Edited By- Priya Dixit