गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 डिसेंबर 2019 (16:11 IST)

माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल : पीडितेचे वडील

हैदराबाद हत्याकांड प्रकरणातील पीडित तरूणीच्या वडिलांनी हैदराबाद पोलिसांचे आभार मानले आहेत. माझ्या मुलीच्या मृत्यूला 10 दिवस झाले. मी हैदराबाद पोलीस आणि सरकारचे खूप आभार मानतो. आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल अशी भावनिक प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली आहे.
 
तरूणीच्या बहिणीने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम्ही या एन्काऊंटरचं स्वागत करतो. आम्ही आज खूप खूष आहोत. आम्ही एन्काऊंटरचा विचारच केला नव्हता. आम्हाला वाटलं होतं की, कोर्टाकडून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली जाईल. आमच्यासोबत उभे राहिलेल्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो. या एन्काऊंटरमुळे यापुढे महिलांविरोधात असं कृत्य करणाऱ्यांना जरब बसेल, अशी प्रतिक्रिया पीडित तरूणीच्या बहिणीने दिली आहे.