1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 डिसेंबर 2019 (15:56 IST)

माझ्या मुलीच्या मारेकऱ्यांना तातडीने फाशी द्या: निर्भयाची आई

Nirbhaya mother
दिल्लीतील 'निर्भया'च्या आईनंही पोलिसांना सलाम केला आहे. सोबतच आपल्या मुलीच्या मारेकऱ्यांना तातडीने फाशी देण्याची विनंती केली आहे. 
 
'गेली सात वर्षं माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून मी संघर्ष करतेय. न्यायालयात खेटे मारतेय. कोर्ट आरोपींच्या मानवाधिकाराचा मुद्दा पुढे करतंय. त्यामुळेच हैदराबादमध्ये जे झालं त्याने मी खूप खूश आहे. पोलिसांनी खूप चांगलं काम केलंय, त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होता कामा नये. उलट त्यांनी एक उदाहरण घालून दिलं आहे. अशा कारवायांची आज गरज आहे, अशा शब्दांत 'निर्भया'ची आई आशा देवी यांनी एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांची पाठराखण करत आपल्या मनातील वेदनांनाही वाट मोकळी करून दिली आहे. 
 
जसा गुन्हा कराल, तशीच शिक्षा मिळेल, हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. हैदराबादमधील घटनेतून सरकारने, दिल्ली पोलिसांनी आणि न्यायालयानेही योग्य धडा घेण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.