गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (11:43 IST)

एकाचवेळी घोंगावताहेत दोन वादळ : आज मुंबई, पुण्यात पावसाचा अंदाज

अरबी समुद्रामध्ये पुन्हा एकदा एकाचवेळी दोन चक्रीवादळे निर्माण होण्याची दाट शक्ता असून पवन आणि अम्फन अशी या वादळांची नाव आहेत. येत्या 24 तासांत ही चक्रीवादळे निर्माण होऊ शकतात, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला असून सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबई, पुणे, नाशिक भागात आज पावसाचा अंदाज स्कोटने वर्तवला आहे.
 
क्यार आणि महा चक्रीवादळांनंतर पुन्हा एकदा तशीच परिस्थिती अरबी समुद्रात निर्माण झाली आहे. ही परिस्थिती दुर्मीळ मानली जाते. अरबी समुद्रात या आधी चार तर बंगालच्या उपसागरात तीन चक्रीवादळांची यावर्षी निर्मिती झाली. त्यातच आता अरबी समुद्रात पवन व अम्फन ही दोन चक्रीवादळे निर्माण होत आहेत. पवन हे नाव श्रीलंकेच्या सूचनेवरून देण्यात आले आहे तर अम्फन हे नाव थालंडच्या सूचनेनुसार देण्यात आले आहे. दोन वादळांचा धोका लक्षात घेऊन संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील मच्छिारांना सतर्क करणत आले आहे.