गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :इंदूर , गुरूवार, 22 जून 2017 (15:47 IST)

इंदूरमध्ये मोठा अपघात! एमवाय दवाखान्यात 5 लोकांना मृत्यू ...

my hospital
शहरातील सर्वात मोठा दवाखाना महाराजा यशवंतराव चिकित्सालय (एमवाय) मध्ये गुरुवारी पहाटे निष्काजळीपणेचे एक मोठे उदाहरण समोर आले आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात ऑक्सिजन लाइन 15 मिनिट बंद राहिल्यामुळे झाला आहे. ऑक्सिीजन बंद असल्यामुळे 5 लोकांचा मृत्यू झाला आहे.  
 
मृतकांमध्ये मानपुरचे बिचोली निवासी नारायण पिता उदय राम (45), बबलई जिल्हा खरगोन निवासी जगदीश पिता दयाराम तथा 70 वर्षीय एक वृद्ध सामील आहे. सांगण्यात आले आहे की वृद्धाला उज्जैनहून या दवाखान्यात भरती करण्यात आले होते. वृत्त असे आहे मरणार्‍यांमध्ये चार मुलं देखील सामील आहे. पण दवाखान्याच्या प्रबंधनाने याची पुष्टी केलेली नाही आहे. एका वृत्तानुसार या चारी मरीजांचा मृत्यू सकाळी 4च्या सुमारास झाला आहे. 
 
दुसरीकडे दवाखाना प्रबंधनाने या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा मीडियाकर्मिंनी एमवायचे अधीक्षक डॉ. वीएस पालशी या बद्दल माहिती मागितली तेव्हा त्यांनी असे काहीही घडले नाही असे सांगितले. इंदूरचे संभायुक्त संजय दुबे यांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.