1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 2 जुलै 2023 (13:36 IST)

Nagpur Accident : कारचा अपघात होऊन कार पुलावरून थेट रेल्वे ट्रॅकवर, 5 जखमी

ANI
काल समृद्धी महामार्गावरील अपघाताची बातमी ताजी असताना नागपुरात बोरखडी शिवारात कार थेट पुलावरून खाली कोसळून अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जण जखमी झाले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास नागपूरच्या बोरखेडी उड्डाणपुलावरून हैदराबाद येथून नागपूरच्या दिशेने प्रवाशी जात असताना चालकाला डुलकी लागल्याने कार पुलावरून खाली जाऊन रेल्वे ट्रॅक वर पडली. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे. 

कार मध्ये एकाच कुटुंबातील प्रवाशी होते. कारमधील प्रवाशी जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना स्थानिकांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
Edited by - Priya Dixit