गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 2 जुलै 2023 (13:30 IST)

Rajsthan : काय सांगता, 24 कोटींचा रेडा

social media
social media
साधारणपणे एखाद्या म्हशींची किंवा रेड्याची किंमत 2 ते 3 लाख रुपये असते. पण राजस्थान मध्ये शेतकरी मेळाव्यात भीमा रेडा हा चर्चेत आला आहे. त्याचे कारण असे आहे की या रेड्याची किंमत भीमा नावाच्या रेड्याची किंमत आहे 24 कोटी. या रेड्याला बघण्यासाठी सभेला येणारा नेता असो. मंत्री असो किंवा सामान्य माणूस असो रेड्याबरोबर सेल्फी काढत आहे.  

बॉलिवूड स्टार सलमान खान सह अनेक देशातील प्रसिद्ध उद्योगपतींनी हा रेडा विकत घेण्याची इच्छा दर्शवली आहे. या रेड्याचे नाव भीमा आहे. त्याची काळजी घेण्यासाठी 3 ते 4 लोक गुंतले आहे. भीमाचे वय 8 वर्ष आहे. त्याच्या दररोजचा जेवणाचा खर्च 4 ते 5 हजार येतो.  

भीमाला 2018 -2019 साली राजस्थानच्या पुष्कर जत्रेतून आणले होते असे त्याचे मालक अरविंद सांगतात. भीमा आतापर्यंत बालोत्रा, नागौर,डेहराडूनसह अनेक जत्रेत गेला असून त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहे. त्याचे वीर्य पशु पालकांना विकले जाते. त्याच्या वीर्याला खूप मागणी असून त्याचे 0.25 एम एल वीर्य 500 रुपयाला विकले जाते. 
 
भीमा 14 फूट लांब असून 6 फूट उंच आहे. भीमावर त्याचे मालक महिन्याचे 2 लाख रुपये खर्च करतात. त्याचा आहार देखील त्याच्या आकाराप्रमाणे मोठा आहे. भीमा दररोज एक किलो तूप, 25 लिटर दूध पितो आणि 1 किलो काजू बदाम खातो. 
 
Edited by - Priya Dixit