Buldhana Accident : बुलढाणा अपघातातील मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार
काल बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा परिसरात नागपूरहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या प्रवासी बसचा झालेल्या अपघातात एकूण 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. बस मध्ये एकूण 33 प्रवाशी प्रवास करत होते. आठ प्रवासी सुखरूप बाहेर पडले. या अपघातामुळे महाराष्ट्र हादरलं आहे. अपघातात होरपळून मृत्युमुखी झालेल्या प्रवाशांची ओळख पटवणे कठीण होत आहे. काही मृतदेह अर्धवट जळाले आहे तर काही पूर्णपणे जळून खाक झाले आहे. सर्व मृतदेहाची डीएनए चाचणीचा फॉरेन्सिक अहवाल येण्यास चार ते पाच दिवस लागणार. त्यामुळे सर्व मृतदेहांवर सामूहिकरीत्या अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार अद्याप काही मृतदेहांची ओळख पटू शकली नाही. 25 पैकी 21 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याची परवानगी कुटुंबीयांनी दिली आहे. 4 जणांच्या कुटुंबियांकडून परवानगी मिळणे आवश्यक असून त्यामध्ये एक मृतदेह मुस्लिम महिलेचे आहे.
विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना सिंदखेडराजा जवळ पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावर रात्री दीड वाजेच्या सुमारास रास्ता दुभाजकाला धडकून बसने डिझेलच्या संपर्कात आल्यामुळे पेट घेतला. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला.तर आठ प्रवासी सुखरूप बाहेर पडले.बस मध्ये एकूण 33 प्रवाशी प्रवास करत होते.
Edited by - Priya Dixit