1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 मे 2024 (19:08 IST)

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

murder knief
नागपूर येथे जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा दोन जणांनी मध्यरात्री चाकू भोसकून खून केल्याची घटना नागपुरात यशोधरानगर येथे घडली आहे. 

यश गोनेकर असे या मयत तरुणाचे नाव आहे. यश चे खून शेख अरबाज शेख इकबाल आणि असलम उर्फ गुड्डू मकसूद अन्सारी अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी यश आणि अरबाजचे  वाद झाले होते. त्याचा राग अरबाज ने मनात ठेवला होता आणि त्या रागाच्या भरात येऊन रात्रीच्या सुमारास फरदीन सेलिब्रेशन हॉल जवळ संशयित आरोपींनी त्यांना अडवलं. आणि यशवर सपासप चाकूने वार केले. या हल्ल्यात यश गंभीर जखमी झाला.

त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून कुटुंबियांना माहिती मिळतातच रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांना यशने घडलेलं सांगितलं तसेच त्याने मारेकऱ्यांची नावे सांगितली. त्याला पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले असून त्याचा उपचाराधीन असता मृत्यू झाला . 

या प्रकरणी यशच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस ठाण्यात शेख अरबाज शेख इकबाल आणि असलम उर्फ गुड्डू मकसूद अन्सारी यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस संशयित आरोपींचा  शोध घेत आहेत. 
 
Edited by - Priya Dixit