शनिवार, 27 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 24 डिसेंबर 2016 (16:48 IST)

शिवस्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

narendra modi
ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या भव्यदिव्य शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल चे. विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार उदयनराजे, संभाजीराजे हेही यावेळी उपस्थित होते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी सव्वादोनच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर पोहोचले. तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पवित्र जल आणि मातीचे कलश स्वीकारले. निवडक निमंत्रितांसोबत ते अरबी समुद्रातील स्मारकासाठीच्या नियोजित ठिकाणी जहाजातून रवाना झाले. त्याठिकाणी त्यांनी जलअर्पण केले. समुद्रात तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या मेघडंबरीला प्रदक्षिणा घातल्या.