बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 डिसेंबर 2016 (16:09 IST)

घटस्फोट रोखण्यासाठी जवानाचे पंतप्रधानांना पत्र

jawan
एका जवानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे घटस्फोट रोखण्यासाठी आणि सोबतच स्वत: संपवण्याची परवानगी पत्र लिहून मागितली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा पथका असलेल्या सत्येंद्र सिंह असे या जवानाचे नाव आहे. तो कांचीपूरम येथील अणूऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी तैनात आहे. सत्येंद्रला सुट्टया मिळत नसल्याने संतापून पत्नीने घटस्फोटाची धमकी दिली. त्यामुळे सत्येंद्रने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आत्महत्येची परवानगी मागणारे पत्र लिहीले आहे. मूळचे रांचीचे असणारे सत्येंद्र सिंह रविवारी सुट्टीवर आपल्या घरी आले. मे महिन्यात मी डयुटीवर रुजू झाल्यापासून मला रजा मिळाली नव्हती. रजेसाठी अर्ज करुनही सुट्टी मंजूर होत नव्हती. डयुटीचा ताण इतका होता की, पत्नीलाही फोन करता येत नव्हता असे सत्येंद्रने सांगितले आहे.