1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 जून 2025 (10:33 IST)

PM मोदींकडून विमान अपघाताची पाहणी

Narendra Modi reached Ahmedabad today
विमान अपघाताची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबादला पोहोचले. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. पंतप्रधान मोदी अपघाताबाबत आढावा बैठक घेणार आहे.

गुरुवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले. त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह अनेकांचा मृत्यू झाला. आज, अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी शुक्रवारी सकाळी विमानाने अहमदाबाद विमानतळावर पोहोचले. येथून त्यांनी थेट घटनास्थळी पोहोचून अपघाताचा आढावा घेतला. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू हे देखील त्यांच्यासोबत आहे. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पंतप्रधानांनी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अपघातातील जखमींची भेट घेतली. त्यानंतर ते गृहमंत्री अमित शहांसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहे.   
एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान गुरुवारी अहमदाबादहून लंडनला निघाले, परंतु उड्डाणानंतर काही वेळातच अहमदाबादच्या मेघनानी नगर भागात विमान कोसळले.

Edited By- Dhanashri Naik