मंगळवार, 27 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 (14:32 IST)

चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीताचे गायन झालेच पाहिजे: सर्वोच्च न्यायालय

चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीताचे गायन झालेच पाहिजे: सर्वोच्च न्यायालय
देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी पडद्यावर तिरंगा दाखवून राष्ट्रगीताचे गायन झालेच पाहिजे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर चित्रपटगृहात उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिले पाहिजे असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 
आतापर्यंत फक्त महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य होते पण आता देशभरात राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे.