मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (10:41 IST)

विविध कामगार संघटनांचा २६ नोव्हेंबरला देशव्यापी बंद

केंद्रातील भाजपा सरकारने आणलेल्या नवीन कामगार आणि शेतकरी कायद्यांना सर्वच स्तरातून विरोध होत आहे. या कायद्यांना विरोध करण्याच्या याच पार्श्वभूमीवर विविध कामगार संघटनांनी २६ नोव्हेंबरला देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला काँग्रेसकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबतची माहिती दिली. 
 
'कामगारांच्या हक्कांचे रक्षण व्हावे यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांनी ४४ कामगार कायदे बनवले. कामगारांवर अत्याचार होऊ नये या हेतूने त्यांना संरक्षण देण्याचे काम या कायद्याच्या माध्यमातून होत आले आहे. परंतु केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आणलेले कायदे हे कामगारांना देशोधडीला लावणारे तसेच बड्या उद्योगपतींचे गुलाम बनवणारे आहेत', असं थोरात म्हणाले.