मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

मार्च महिन्यात बँका सलग आठ दिवस बंद राहणार

विविध मागण्यांसाठी संघटनांनी पुकारलेला बंद आणि शासकीय सुट्टीमुळे मार्च महिन्यात बँका सलग आठ दिवस बंद राहणार आहेत. 8 ते 15  मार्चदरम्यान बँकांना ताळे राहणार असल्यामुळे त्यापूर्वीच बँकांचे व्यवहार पूर्ण करावे लागणार आहेत. दरम्यान, 29 फेब—ुवारीला दिल्लीत केंद्रीय श्रम आयुक्तालयाच्या आदेशान्वये इंडियन बँक असोसिएशन आणि  युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात झालेल्या बैठकीत मागण्यांबाबत तोडगा निघाल्यास संप मागे घेण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास संप कायम राहणार आहे.  
 
8 मार्च रविवार, 9 मार्च होळी, 10 मार्चला धुलिवंदन, 11 ते 13 मार्चदरम्यान 9 बँक संघटनांनी पुकारलेला संप, 14 मार्चला दुसरा शनिवार आणि 15  मार्चला रविवार त्यामुळे बँका आठ दिवस बंद राहणार आहेत. या संपानंतरही मागण्या मान्य न झाल्यास 1 एप्रिलपासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे.