शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (18:15 IST)

नवजोतसिंग सिद्धू यांनी योगी सरकारला दिला इशारा

पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांनी उत्तर प्रदेश सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, उद्यापर्यंत जर शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक करण्यात आली नाही आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना सोडण्यात आले नाही तर पंजाब काँग्रेस लखीमपूर खेरीच्या दिशेने मोर्चा काढेल.
 
नवजोतसिंग सिद्धू यांनी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारचे नाव न घेता ट्विट केले, “जर उद्यापर्यंत शेतकऱ्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलीला अटक करण्यात आली नाही आणि बेकायदेशीरपणे आमच्या नेत्या प्रियंका गांधीला अटक करण्यात आली तर पंजाब काँग्रेस लखीमपूर खेरीच्या दिशेने मोर्चा काढेल.
 
शांतता भंग केल्याबद्दल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा, राज्यसभा खासदार दीपेंद्र हुड्डा आणि यूपी काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार लल्लू यांच्यासह 11 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर यूपी पोलिसांनी प्रियंका गांधीला अटक केली आहे. सीतापूर जिल्ह्यातील हरगाव पोलीस स्टेशनच्या एसएचओने ही माहिती दिली आहे.
 
पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी दिल्लीला रवाना
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी चंदीगडहून दिल्लीला रवाना झाले आहेत. तत्पूर्वी ते म्हणाले, "आज शेतकरी अस्वस्थ आहे, देशातील शेतकरी मरत आहे, केंद्र सरकारने हे तिन्ही कायदे त्वरित रद्द करावे आणि अशा घटना थांबवाव्यात. मी या प्रकरणासाठी दिल्लीला जात आहे आणि गृहमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करेन.