शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (15:46 IST)

नवज्योतसिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

नवज्योत सिंग सिद्धू यांनीही पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सिद्धू हे चरणजीतसिंग चन्नी मंत्रिंडळात उपमुख्यमंत्री होणार असल्याने त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असावा अशी चर्चा आहे.
 
सिद्धूचा कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचण्यात मोठा हात होता. पण, आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली आहे. सिद्धूंनी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे.
 
नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "माणसाचे चारित्र्य अधःपतन तडजोडीने सुरू होते आणि मी पंजाबच्या भविष्याशी आणि पंजाबच्या कल्याणाच्या अजेंड्याशी तडजोड करू शकत नाही ..., मी पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे ... काँग्रेसची सेवा करत राहीन ... "