रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (12:16 IST)

हिमाचल: लाहौलच्या खंमीगर ग्लेशियरमध्ये ट्रेकर्ससह 14 जण अडकले,दोघांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातील आदिवासी जिल्हा लाहौल-स्पीतीमधील खंमीगर ग्लेशियरमध्ये ट्रेकवर गेलेल्या दोन लोकांचा ताज्या बर्फवृष्टीनंतर थंडीने मृत्यू झाला आहे.18 सदस्यीय संघापैकी दोन जण परत आले आहेत तर 14 जण अजूनही ग्लेशिअर मध्ये अडकले आहेत.भौगोलिक परिस्थितीमुळे हेलिकॉप्टरची मदत मिळणे शक्य नाही.त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी 32 सदस्यीय बचाव पथकाची स्थापना करण्यात आली आहे.या पथकाला ग्लेशियरवर पोहोचायला तीन दिवस लागतील मिळालेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबर रोजी पश्चिम बंगालच्या इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशनची सहा सदस्यीय टीम काजा वाया खंमीगर ग्लेशियर ट्रॅक (सुमारे 5034 मीटर उंच) ओलांडण्यासाठी बातळ हून निघाली होती.
 
संघासोबत 11 पोटर (सामान उचलणारे) आणि स्थानिक मार्गदर्शक (शेरपा) होते. ताज्या बर्फवृष्टीमुळे हा संघ तीन दिवसांपूर्वी ग्लेशियरमध्ये अडकला होता.भास्कर देव मुखोपाध्याय (61) सनराईज अपार्टमेंट 87 डी आनंदपूर बॅरकपूर कोलकाता पश्चिम बंगाल आणि संदीप कुमार ठाकूरता (38) 3 रायफल रेंज रोड प्लॉट नं ZA, पुव्यान आवासन बेलगोरिया पश्चिम बंगाल अत्यंत थंडीमुळे मरण पावले.अतुल (42) आणि पश्चिम बंगालमधील एका पोटर ने कसे बसे काझा गाठले आणि सोमवारी स्थानिक प्रशासनाला कळवले. लाहौल-स्पीतीचे उपायुक्त यांनी सांगितले की, रेस्क्यू टीममध्ये 16 आयटीबीपी आणि 6 डोगरा स्काऊट जवानांचा समावेश आहे. त्यांच्यामध्ये एक डॉक्टरही आहे. तसेच 10 पोटर देखील आहेत. 
 
काह गावापासून बचावकार्य सुरू होईल 
पिन खोऱ्यातील काह गावापासून बचाव कार्य सुरू होईल. 28 सप्टेंबरला पहिल्या दिवशी टीम काह ते चंकथांगो, दुसऱ्या दिवशी चंकथांगो ते धार थांगो आणि तिसऱ्या दिवशी धारथांगो ते खंमीगर ग्लेशियर टीम पर्यंत पोहोचेल.खंमीगर ग्लेशियरवरून काहला पोहचायलाही तीन दिवस लागतील.