1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (10:19 IST)

विचित्रच ! REET च्या परीक्षेसाठी 6 लाखाची ब्लूटूथ चप्पल,तिघांना अटक

लोक नक्कल करण्यासाठी काय-काय ते करतात,असच काही घडले आहे राजस्थानच्या जयपूर मध्ये घडले आहे.इथे ब्लूटूथ चप्पलच्या मदतीने कॉपी करणारी टोळी राजस्थान शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात REET परीक्षेत उघडकीस आली.खरं तर, रविवारी परीक्षा सुरू होताच राजस्थान पोलीस सक्रिय झाली आणि अनेक नकल करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अटक करण्यात आली.या दरम्यान, पोलिसांनी उमेदवारांची फसवणुक करून नकल करण्यासाठी उमेदवारांना 6 लाख रुपयांना ब्लूटूथ उपकरणांसह चप्पल विकणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला. पोलिसांनी या टोळीतील तिघांना बिकानेर येथून अटक केली.आरोपी ज्या चप्पल विकत होते त्याच्या मदतीने कोणताही उमेदवार परीक्षा हॉलमध्ये बसून सहज कॉपी करू शकतो.
 
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील बिकानेर येथून अटक करण्यात आलेल्या आरोपींनी राज्यभरातील सुमारे 25 उमेदवारांना अशा चप्पल विकल्या आहेत. पोलीस चौकशी दरम्यान त्याने एका चप्पलची किंमत 6 लाख रुपये असल्याचे सांगितले. आता राज्यभरातून या आरोपींना कसे पकडायचे हे पोलिसांसाठीही एक आव्हान बनले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात करत आहे.
 
REET परीक्षेत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उमेदवार फक्त चप्पल घालून परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करू शकतात.अशा परिस्थितीत कॉपी करणाऱ्या टोळीने अनोख्या चप्पलचा शोध लावला.या अनोख्या चपलांमध्ये ब्लूटूथ बसवण्यात आले असून त्याची किंमत 6 लाख असल्याचे सांगितले जाते. ब्लूटूथ उपकरणाने सज्ज असलेली ही चप्पल घालून उमेदवार परीक्षा हॉलमध्ये सहज कॉपी करू शकतो.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे.हे सर्व चुरूचे रहिवासी आहेत.त्याचवेळी एका आरोपीला नकलकरण्याच्या प्रकरणात आधीच अटक झाली आहे.