शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 26 सप्टेंबर 2021 (14:48 IST)

कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या या गावाचे पंतप्रधानांनी केले कौतुक

कचऱ्या पासून वीज निर्मिती करणारे तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील कांजिरंगल गावाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जाते आहे.आपण टाकाऊ पासून टिकाऊ असे ऐकले आहे आणि बऱ्याच वेळा प्रत्यक्षात असं करतो देखील. पण तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील कांजिरंगल गावात प्रत्यक्षात हे राबविले जाते.मिळालेल्या वृत्तानुसार या गावात कचऱ्या पासून वीज निर्मिती केली जाते. गेल्या महिन्यात पंत प्रधान मोदी यांनी देखील या प्रकल्पासाठी या गावाचे कौतुक मन की बात या कार्यक्रमात केले होते.

या गावात लोक घरातील कचरा वाया न घालवता वीज निर्मितीसाठी देतात.गावातील घरातील आणि हॉटेलातील साचलेल्या कचऱ्यापासून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाते.ही वीज शेतीकामासाठी तसेच इतर कामासाठी वापरण्यात येते.या गावातील ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती केली जाते. या साठी प्लांट लावण्यात आले आहे.ज्यामध्ये कचऱ्याचे निरसन करून त्यावर प्रक्रिया केली जाते आणि वीज निर्मिती केली जाते.या प्रकल्पाचे पंतप्रधान मोदी यांनी देखील कौतुक केले आहे.या जिल्ह्यात अशी अनेक प्लांट लावण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.या गावात रस्त्यावर दिवे लावण्यात आले आहे.या गावात आणि शेतात कचऱ्या पासून निर्मित केलेल्या विजेचा वापर केला जातो. या गावाचे सर्वत्र कौतुक होत आहे.