शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (11:53 IST)

धक्कादायक अपघात: REET परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेली व्हॅन ट्रकला धडकली, सहा जण जागीच ठार

राजस्थानच्या जयपूरमध्ये शनिवारी मोठा रस्ता अपघात झाला.येथील चाकसू येथील NH-12 निमोदिया वळणावर ट्रक आणि व्हॅनची जोरदार धडक झाली,ज्यात सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेत पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.जखमींना चाकसू येथील  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सांगितले जात आहे की व्हॅनमधील 11 प्रवाशी REET परीक्षा देण्यासाठी बारां येथून सीकरला जात होते.
 
 ट्रक आणि व्हॅनची धडक एवढी जोरदार होती की व्हेन उडून त्याचे भाग हवेत उडाले.या अपघातात व्हॅन चालकाचाही मृत्यू झाला.तर या मध्ये बसलेल्या चार परीक्षकांचाही जागीच मृत्यू झाला. जखमी विद्यार्थ्यांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. मृतदेहांची ओळख पटवली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दोन्ही वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.