दूध मागत असलेल्या अडीच वर्षांच्या मुलाला आईने जमिनीवर आपटले, जागीच मृत्यू
एक निरागस बाळ वारंवार आईकडे दूध पिण्याचा आग्रह करत होते. यामुळे संतप्त झालेल्या क्रूर आईनं मुलाला पकडून जमिनीवर जोरात आपटले, ज्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना छत्तीसगडच्या कोरबा येथील बालकानगर परिसरातील आहे. प्रमिला असे या क्रूर मातेचे नाव असून या तीन वर्षांच्या मुलाचे सात्विक राव असे नाव होते. पोलिसांनी आईला अटक केली आहे. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली.
अडीच वर्षांचा सात्विक दूध पिण्याचा आग्रह करत होता. मुलाने वारंवार दुध मागितल्यानंतर आई प्रमिला (32) रागावली आणि तिने मुलाला जमिनीवर आपटले. या घटनेत निष्पाप गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच कुटुंबाने मुलाला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांना माहिती मिळाली आहे की सात्विक राव बुधवारी संध्याकाळी दूध पिण्याचा आग्रह करत होता. मुलाने वारंवार दूध मागितल्यानंतर आईने रागाच्या भरात मुलाला जमिनीवर जोरात आपटले. या घटनेत मूल गंभीर जखमी झाला. जेव्हा कुटुंबातील सदस्यांना घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी मुलाला रुग्णालयात नेले जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी महिलेची सासू आणि सासरे घरात उपस्थित होते. प्रमिलाचे पती रामचंद्र राव हे बाल्को प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक आहेत. घटनेच्या वेळी ते घराबाहेर होते. त्याने सांगितले की पोलिसांना माहिती मिळाली आहे की 2014 पासून प्रमिलाची मानसिक स्थिती चांगली नाही आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा पोलिसांना घटनेची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आणि महिलेला अटक करण्यात आली. या महिलेची चौकशी केली जात आहे.