गुरूवार, 20 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 31 मे 2023 (21:55 IST)

नौदलाचे पाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर MH-60R प्रथमच INS विक्रांतवर उतरले

Indian navy
भारतीय नौदलाचे MH-60 रोमियो हेलिकॉप्टर प्रथमच स्वदेशी विमानवाहू जहाज INS विक्रांतवर यशस्वीपणे उतरले. भारतीय नौदलाने यूएस-निर्मित MH-60R हेलिकॉप्टरच्या पहिल्या यशस्वी लँडिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे, त्याला पाणबुडीविरोधी युद्ध आणि नौदलाची लष्करी क्षमता वाढवणारे सांगण्यात आले आहे. 
 
 यूएस कंपनी लॉकहीड मॉर्टिन याने  MH-60 रोमियो ला निर्मित केले आहे. हे जगातील सर्वात प्रगत पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर मानले जाते आणि ते नौदलाच्या युद्धनौकांवर तैनात केले जातील. भारताने 905 दशलक्ष डॉलर्सच्या सरकारी करारामध्ये 24 हेलिकॉप्टरची ऑर्डर दिली आहे. त्यात भारतीय नौदलात दोन हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला आहे. 
 
 सर्व हवामानातं चालणाऱ्या एकाधिक मोहिमांना समर्थन देण्यासाठी हे हेलिकॉप्टर डिझाइन केले गेले आहे. जे नौदलाच्या ब्रिटीश-निर्मित सीकिंग हेलिकॉप्टरची जागा घेणार जे 1971 पासून त्याच्या हेलिकॉप्टर ताफ्याचा मोठा भाग आहेत.
 
 




Edited by - Priya Dixit