बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 13 डिसेंबर 2021 (21:48 IST)

राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ गट तृणमूल काँग्रेसमध्ये विसर्जीत केला आहे. चर्चिल यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहत तृणमूल काँग्रेसचा आमदार म्हणून विधानसभेत जागा देण्याची विनंती केली आहे.
आतापर्यंत तृणमूल पक्षात सामील होण्याचा निर्णय सतत लांबणीवर टाकणारे बाणावलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव हे सोमवारी त्यांची कन्या वालंका आलेमाव हिच्यासह तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा होती. दरम्यान या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.