1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 27 एप्रिल 2019 (10:16 IST)

नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला

Neerav Modi
कर्जबुडव्या हिरे व्यापारी नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. लंडन पोलिसांच्या कोठडीत असलेला नीरव आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी हजर होता. वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयानं नीरवचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्याच्या कोठडीमध्ये २४ मेपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे नीरवला आणखी जवळजवळ महिनाभर गजाआडच काढावे लागणार आहे. भारत सरकारनं केलेल्या प्रत्यार्पणाच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 
 
पीएनबी बँकेचे १४ हजार कोटी रुपये घेऊन देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याने जामीन अर्ज लंडनच्या न्यायालयाने सादर केला होता. हा अर्ज दुसऱ्यांदा फेटाळून लावला आहे. त्याचबरोबर त्याच्या पोलीस कोठडीत २४ मेपर्यंत वाढ करण्यात आली असून त्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. यापूर्वी २९ मार्च रोजीही लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने त्याचा जामीन फेटाळून लावला होता.