बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (12:06 IST)

वैद्यकीय उपकरणांसाठी नवा कायदा

केंद्र सरकार वैद्यकीय उपकरणांची गुणवत्ता आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठी एक नियम लागू करत आहे. या नियमांतर्गत आता वैद्यकीय उपकरणांच्या गुणवत्ता आणि सुरक्षेची जबाबदारी कंपन्यांची असणार आहे. हा नियम १ एप्रिल २०२०पासून सुरु होणार आहे. या नियमांतर्गत आता सर्व मेडिकल उपकरणं बनवणाऱ्या कंपन्यांना, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडे (CDSO) रजिस्ट्रेशन करावं लागणार असून त्याचं प्रमाणपत्र घ्यावं लागेल. 
 
जर मेडिकल उपकरणांबाबत कोणतीही तक्रार आल्यास केंद्र सरकार यांची चौकशी करेल. त्यानंतर मेडिकल उपकरणांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता आढळल्यास केंद्र सरकार त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन रद्द करु शकतं. 
 
केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, या उपकरणांमध्ये स्टेंट, ऑर्थोपेडिक इम्पलांट यंत्र, सीटी स्कॅन (CT), एमआरआय (MRI), PET, डायलिसीस (Dialysis) मशीन, एक्सरे (Xray) यांसारख्या मशीन्सचा समावेश होणार आहे.