सोमवार, 30 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (21:45 IST)

अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा

अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या कथित आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे. यात भोपाळच्या फॉरन्सिक अधिकाऱ्याने १०९ पानाचं व्हॉट्सअप चॅट कोर्टासमोर सादर केले आहे. त्यात पलक आणि पीयूष जीजू यांच्यातील संवादाचा उल्लेख आहे. त्यात मांत्रिकाचाही उल्लेख आहे. 
 
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पलकचा मोबाईल जप्त केला. यातील व्हॉट्सअप चॅट डेटा रिकवर करण्यात आला. पलकने पीयूष जीजूसोबत भय्यू महाराजांबद्दल बोलल्याचं आढळलं. यात आयुषी आणि कुहूचाही उल्लेख आहे. डॉ. आयुषी ही भय्यू महाराजांची दुसरी पत्नी आहे. तर कुहू त्यांच्या मुलीचं नाव आहे.
 
या व्हॉट्सअप चॅटमधून भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यात काही कोडवर्ड आहेत. म्हणजे BM ला वेडं ठरवून घरात बसवणं. मांत्रिकासोबत २५ लाखांची डील झाली. पोलिसांनी पलकला भय्यू महाराज यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली होती. अप्पर सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.