मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (15:14 IST)

शाळेतील भांडण पोलीस ठाण्यात पोहोचले, मुलाने पेन्सिल चोरल्याची तक्रार केली

शाळा सुरु  झाली की मुलांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणांवरून भांडण होत असतात. दररोजच्या तक्रारी वर्ग शिक्षकांकडे मुलं करतातच. पण आंध्रप्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील कुडबुरु पोलीस ठाण्यात एक निरागस मुलगा वर्गात होणाऱ्या भांडणाची तक्रार घेऊन चक्क पोलीस ठाण्यात पोहोचला. कारण होते पेन्सिल चोरी गेल्याचे. 
सध्या सोशल मीडियावर पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेलेल्या या लहान मुलांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्राथमिक गटात शिकणारे हे विद्यार्थी त्यांच्या वर्गात  शिकणाऱ्या एकाच मुलाची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले. या मुलाने एका  मुलावर त्याची पेन्सिल चोरी करण्याचा आरोप लावला होता. या घटनेचा व्हिडीओ आंध्रप्रदेश पोलिसांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे . या व्हिडिओमध्ये चिमुकला मुलगा आपल्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलाच्या विरोधात तक्रार करून म्हणत होता की याने माझी पेन्सिल चोरली आपण याला शिक्षा द्या.
नंतर पोलिसांनी शांतपणे त्याची तक्रार ऐकली आणि त्याला समजावले की  तू आपली तक्रार मागे घे नाहीतर  दोषी मुलाला तुरुंगात जावे लागेल आणि त्याचे आयुष्य खराब होईल. नीट विचार कर आणि आपली तक्रार माघारी घे. नंतर मुलाने विचार करून तक्रार मागे घेतली आणि आरोप लावलेल्या मुलाशी  हात मिळवणी केली. नंतर सगळे हसत ठाण्यातून बाहेर पडले .