बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (09:36 IST)

धक्कादायक !एकाच कुटुंबातील ५ जणांनी विष प्राशन केले, एका मुलीचा मृत्यू

मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उर्वरित सदस्यांवर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील पैशाच्या व्यवहारामुळे संपूर्ण कुटुंबानेच हे भयंकर पाऊल उचलले आहे. पती-पत्नी, 2 मुले आणि पतीच्या आईने विष प्राशन केले. त्याच वेळी, एका मुलीचे वय 21 वर्षे आणि दुसऱ्या मुलीचे वय 16 वर्षे आहे. उपचारादरम्यान 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याशिवाय कुटुंबातील इतर सर्व सदस्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिपलानी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.