1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (10:38 IST)

New Wage Code: आता आठवड्यातून फक्त 4 दिवसच करावे लागणार काम, 3 दिवसांची सूट!

New Wage Code: Now you have to work only 4 days a week
नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असून, वर्षाच्या सुरुवातीला अनेक बदलही होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होईल. नौकरदार वर्गासाठी केंद्र सरकारच्या निर्णयाचा परिणाम त्यांच्या  सुट्ट्या आणि कामाच्या तासांवर होणार आहे.
केंद्र सरकार नवीन वेतन संहिता लागू करणार आहे. पुढील आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. परंतु अशा अनेक तरतुदी या नवीन वेतन संहितेत देण्यात आल्या असून, त्यामुळे कार्यालयात काम करणाऱ्या पगारदार वर्गावर, कारखाने आणि मिल मध्ये काम करणाऱ्या कामगारांवर मोठा परिणाम होणार आहे. प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांचे पगार आणि कामाचे तास यात बदल होणार आहेत.
नवीन वेतन संहितेनुसार कामाचे तास 12 तासांपर्यंत वाढवण्यात येणार आहेत. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित कामगार संहितेत आठवड्यातून 48 तास काम करण्याचा नियम लागू होईल, असे म्हटले आहे. जर 12 तास काम केले तर आठवडयातून 3 दिवस सुट्टी मिळेल . जर कोणी दिवसातून 8 तास काम केले तर त्याला आठवड्यातून 6 दिवस काम करावे लागेल. म्हणजेच त्या कर्मचाऱ्याला फक्त एक दिवस सुट्टी मिळेल.विशेष म्हणजे 12 तास काम आणि 3 दिवस सुट्टी या नियमावर काही युनियन्सनी प्रश्न उपस्थित केले होते. 12 तास काम आणि सुट्टीच्या नियमावर संघटनांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर सरकारने त्यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. सरकारने म्हटले आहे की, आठवड्यात 48 तास काम करण्याचा नियम लागू होईल, नवीन नियमांचा सर्वात मोठा फायदा ओव्हरटाइमशी संबंधित आहे. जर तुम्ही 15 मिनिटांपेक्षा जास्त काम केले तर कंपनीला ओव्हरटाईम द्यावा लागेल. नवीन कामगार संहितेच्या बाबतीत, 13 राज्यांनी मसुदा नियम जारी केले आहेत. खरे तर केंद्र सरकारने कामगार कायद्याला आधीच अंतिम स्वरूप दिले आहे. पण तरीही राज्यांनी स्वतःच्या वतीने नियम बनवण्याची गरज आहे.