1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 18 जून 2024 (13:02 IST)

दुबईला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बाँम्ब असल्याची बातमी, दिल्ली एयरपोर्ट वर गोंधळ

दिल्लीवरून दुबईला जाणाऱ्या एका विमानामध्ये बाँम्ब असल्याची बातमी मिळाळ्याने एकच गोंधळ झाला. या धमकी नंतर दुबईला जाणाऱ्या विमानाची तपासणी करण्यात आली. पण ही धमकी अफवा असल्याची सिद्ध झाली. 
 
पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकारीने सांगितले की, सोमवारी सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी आईजीआई विमानतळावर डायल कार्यालयाला आलेल्या एका ईमेल मधून समजले की, दिल्लीवरून दुबईला जाणाऱ्या विमानामध्ये बाँम्ब ठेवण्यात आला आहे. अधिकारींना ही माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांना लागलीच विमानाची झडती घेण्यास सांगण्यात आले. पण काहीही संशयास्पद आढळले नाही. दिल्लीमध्ये अनेक वेळेस धमकीचे ईमेल आले आहेत.