शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (13:31 IST)

उत्तर काश्‍मीरमधील अपक्ष आमदार राशिद इंजिनिअरला अटक

टेररफंडींग प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने उत्तर काश्‍मीरमधील अपक्ष आमदार राशिद इंजिनिअरला अटक केली आहे. काश्‍मीर खोऱ्यात मोठया प्रमाणावर निर्बंध लागू आहेत. कलम 370 रद्द केल्यानंतर मागच्या चार दिवसांमध्ये खबरदारी म्हणून काश्‍मीर खोऱ्यातून 800 पेक्षा जास्त राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवादाला निधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रकरणात मागच्या आठवडाभरापासून राशिदची एनआयएकडून चौकशी सुरु होती. 
 
काश्‍मीर खोऱ्यात अस्थिरता निर्माण करण्यासाठी फुटीरतावाद्यांना पाकिस्तानातून पैसा मिळत असल्याचे आरोप असून या प्रकरणी एनआयएकडून चौकशी सुरु आहे. राशिद इंजिनिअरने झाहूर वाताली बरोबर व्यवहार केल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. काश्‍मीरमधील अन्य फुटीरतवाद्यांसोबतही त्याचे आर्थिक व्यवहार झाले आहेत असे वरिष्ठ एनआयए अधिकाऱ्याने सांगितले. टेरर फंडिंगच्या प्रकरणात पाकिस्तान आणि काश्‍मिरी फुटीरतवाद्यांमध्ये झाहूर वातालीची महत्वाची भूमिका होती. पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयाकडून त्याला पैसे मिळाल्याचा आरोप आहे.