शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (08:55 IST)

जम्मूमधून जमावबंदी हटवण्यात आली

जम्मूमधून कलम १४४ (जमावबंदी) हटवण्यात आली आहे. शनिवार म्हणजेच १० तारखेपासून सर्व शाळा आणि कॉलेज सुरु करण्यात येणार आहे. मात्र इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान यांनी दिली आहे. जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करण्याची घोषणा करण्याआधीच सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर १४४ कलम लागू करण्यात आलं होतं. 
 
अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर जमावबंदी हटवण्यात आली असल्या कारणाने सुरक्षा यंत्रणांना सुरक्षेकडे अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील परिस्थितीचा आढवा घेतला.