गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 डिसेंबर 2017 (09:46 IST)

भारतीय सैन्याच्या शब्दकोशात 'मार्टर' आणि 'शहीद' शब्द नाहीत

देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानाला शहीद असा उल्लेख आपण करतो. मात्र, भारतीय सैन्याच्या शब्दकोशात 'मार्टर' आणि 'शहीद' सारखे शब्दच नसल्याची माहिती समोर आली आहे. संरक्षण आणि गृह मंत्रालयाने केंद्रीय माहिती आयोगाला दिलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे. आरटीआयमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता. यात कायद्यानुसार शहीद या शब्दाचा अर्थ काय आहे आणि त्याची परिभाषा काय आहे?
 
आरटीआयमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाला योग्य उत्तरचं मिळालं नाही. हा अर्ज गृह आणि संरक्षण मंत्रालयात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे गेला. पण योग्य उत्तर मिळूच शकलं नाही.  आता यासंदर्भात सूचना आयुक्त यशोवर्धन आझाद यांनी सांगितले की, संरक्षण मंत्रालयातर्फे एका अधिकाऱ्याने म्हटलं की, 'मार्टर' आणि 'शहीद' सारख्या शब्दांचा वापर केला जात नाही. तर, त्याऐवजी 'बॅटल कॅज्युअल्टी' या शब्दाचा वापर करण्यात येतो. तर, गृह मंत्रालयात 'ऑपरेशन्स कॅज्युअल्टी' या शब्दांचा वापर करण्यात येतो.