नोएडा विमानतळ दिल्लीतील विमानतळापेक्षा भव्य असेल - शिंदे
उत्तर प्रदेशातल्या नोएडामधलं विमानतळ हे दिल्लीतल्या इंदिरा गांधी विमानतळापेक्षा मोठं असेल, असं वक्तव्य केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलं आहे.
नोएडा विमानळतळाच्या भूमिपूजनचा सोहळा शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.
या विमानतळामुळे 60 हजार कोटींची गुंतवणूक येईल, 1 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असंही शिंदे म्हणाले. या विमानतळाचं पहिल्या टप्प्यातील काम 2024 मध्ये पूर्ण होणार आहे.