शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 28 ऑगस्ट 2022 (14:38 IST)

Noida Twin Tower Update : नोएडाचा ट्विन टॉवर पत्त्याच्या घरासारखा कोसळला

नोएडाच्या सेक्टर-93A मध्ये बांधलेले 103 मीटर उंच ट्विन टॉवर उद्ध्वस्त झाले आहेत. कुतुबमिनारपेक्षा उंच इमारती अवघ्या 9-12 सेकंदात नष्ट झाल्या. त्याच्या विध्वंसासाठी, सुमारे 9640 छिद्रांमध्ये 3700 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. पोलिसांपासून एनडीआरएफ, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर चबरोबर वायू प्रदूषण रोखण्यासाठी पाण्याचे टँकर उपलब्ध असून त्यातून पाण्याची फवारणी केली जात आहे. अँटी स्मॉग गनही बसवण्यात आल्या आहेत. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर वाहनांची वाहतूक बंद आहे. तीनच्या सुमारास ते उघडले जाईल.
स्फोटानंतर नोएडाचे ट्विन टॉवर पत्त्यांच्या घरा सारखे कोसळले. स्फोट करण्यासाठी सुमारे 3,700 किलोपेक्षा जास्त स्फोटकांचा वापर करण्यात आला.